न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२३) :- गुरु माऊली आण्णासाहेब मोरे महासत्संग सोहळा कार्यक्रमात दर्शन घेत असताना अज्ञात इसमाने गर्दिचा फायदा घेत फिर्यादीच्या गळ्यातील ३५,००० रुपये किंमतीचे १२.४७० ग्रॅम वजनाचे फॅन्सी मंगळसूत्र व १,३०,००० किंमतीचे ४३ ग्रॅम वजनाचे मोठे मंगळसूत्र असा एकुण १,६५,००० किंमतीचा ऐवज फिर्यादीच्या नकळत चोरी करून नेला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. ११) रोजी दुपारी २.०० वाजेच्या सुमारास पीआयईसीसी ग्राऊंड, मोशी येथे घडली. फिर्यादी महिलेने आरोपी अज्ञात इसमाविरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी (दि. ११) रोजी ५२/२०२३ भारतीय दंड संहिता कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















