न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२३) :- नोकराने बंगल्यात डॅशबोर्डवर लावलेली चावी घेतली. बंगल्यातील दोन लाखांची व्होक्सवेगन कंपनीची पोलो गाडी (एचएच१२आरबी७१७१) चोरी करुन नेली.
फिर्यादी चंदनराज रमाशंकर पंडीत (वय ३४ वर्षे, धंदा-नोकरी, रा. बेसील गार्डन, फ्लॅट नंबर ७, बाणेर) यांनी आरोपी दिपक छबु बागुल (वय-३५ वर्षे, रा-सध्या सिंघासन बँगलो, तपोवन हौसींग सोसायटी, बावधन, मुळगाव-तुलसी रो हाऊस नंबर-६/ए, पाथर्डी फाटा नाशिक) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार (दि. १०) रोजी ५.०० वाजत सिंहासन बंगलो, तपोवन होसींग सोसायटी, पोलीस चौकी पाठीमागे, बावधन येथे घडला. हिंजवडी पोलिसांनी (दि. ११) रोजी ११७ / २०२३ भा.दं.वि. कलम ३८१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















