न्यूज पीसीएमसी नेटवर्क
राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी मावळ लोकसभा मतदार संघ व जिल्ह्यातील पक्षाचे बूथ, कमिटीप्रमुख, तालुकाध्यक्ष व प्रमुख कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
यावेळी पार्थ पवार, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रदेश सचिव उमेश पाटील, भाऊसाहेब भोईर, मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, बुथप्रमुख व आदी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना, शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रश्नांना हात घातला. शहरात केलेल्या विकासकांच्या जोरावर आम्ही मतदारांपुढे गेलो होते. त्यामुळे एवढे काम झाल्यावर नागरिक खूश असताना सत्ता जाणे सोपे नव्हते. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत ‘मशिन’मध्येच काही गडबड झाली आहे, असे मला वाटते.
”आता लांबून, बघतो एकतो. पिंपरी महापालिकेत केवळ गोंधळ चालू आहे. मतभेद आहेत. सतत काही ना काहीतरी वाद असतात”, अशी खंतही पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी बोलून दाखविली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर सतर्क रहावे. जागरुक राहून खोटी बातमी आल्यास तातडीने खोडून काढावी. त्यास लगेचच सोशल मिडीयातून उत्तर द्यावे. परंतु, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे. कायद्याचे उल्लंघन करू नका.











