- बेडकाच्या फुगरटपणाचे देखील दिले उदाहरण..
- गत निवडणुकीतील त्या लाखाच्या मताचेही गुपित केले उघड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क ‘
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा पोट निवडणुकित महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराकरिता वाल्हेकरवाडीत “महाविकास आघाडी संयुक्त मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना चिमटे काढत आपली नाराजगी व्यक्त केली.
ते म्हणाले, पोटनिवडणुकीसाठी काहीजण उमेदवारी मागत होते. शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्याशी चर्चा केली. सकाळी साडेनऊ पर्यंत बोलणे चालू होते. ठाकरेंची परवानगी घेऊन नाना काटे यांचं नाव फायनल केलं. त्यानंतर जयंत पाटलांनी ट्वीट करीत उमेदवारी जाहीर केली. अपक्ष उमेदवाराचा फॉर्म राहु नये म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करत होतो. स्ट्रेट फाईट होऊ द्या, जशी कसब्यात होत आहे. यासाठी प्रयत्न सुरु होता. खूप प्रयत्न करून देखील त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.
गत निवडणुकीत ‘ मला एक लाखापेक्षा अधिक मते पडली ‘, अशी त्यांची समज होती. परंतु ती शिवसेनेची, आघाडीची मते होती. मी चिंचवडमध्ये उमेदवार उभा केला नव्हता. आम्ही अपक्षाला पाठींबा दिला होता. पिंपरी आणि भोसरीत उमेदवार दिला होता. पण ” बेडूक जेव्हा फुगतं, तेव्हा बेडकाला वाटतं, मीच फुगतोय; परंतु, फुगलेलंपण काय कामाचं नसतं; त्यामुळे त्याचा बोलविता धनी दुसराच कोणीतरी दिसतोय”. कोणीतरी नंतर त्याला सांगितलं ‘ तू फॉर्म ठेव. निवडणूक सोपी जाईल’. काहीजण म्हणतात ” आम्हीच त्यांना फॉर्म ठेवायला सांगितला. दुरान्वयेदेखील याचा सबंध नाही. आम्ही शेवट पर्यत त्याला फ्रॉम मागे घ्यायला सांगितला होता. आता त्यालाही कळू द्या त्याच्यामागे किती मतं आहेत ते”.
उदाहरण देताना अजित पवार म्हणाले, ” मराठवाड्यात शिक्षक संघाची निवडणूक होती. ती जागा राष्ट्रवादीला मिळाली. आम्ही साहेबांनी ठरवून उमेदवार फायनल केला. मात्र, राष्ट्रवादीच्या पठ्ठ्याने बंड केलं. त्याला समजवून सांगण्याचं काम केलं. शेवटी लोकांनी सांगितलं ‘दादा त्याला पाचेशच मतं पडतील’. तो तर आपला वक्ता होता, अशी माझी समज होती. परंतु, निवडणुकीत त्याला फक्त चारशेवर मतं पडली. कधी आम्हालाही वाटतं आम्ही लयं मोठ झालो. आपल्याला वाटतं आपल्यामागे जनता आहे. परंतु, त्या उमेदवाराच्या मागे पक्ष ,संघटना, नेते आणि त्याचे वलयदेखील असते. म्हणून ते तिथे निवडून येत असतात. परंतु काहीजन हे विसरून जातात.”


















