न्यूज पीसीएमसी नेटवर्क ‘
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गॅंगने अक्षरशः धुमाकूळ घालून पोलिसांच्या नाकी नऊ आणले आहे. त्यासह पुण्यातील वेगवेगळ्या भागात देखील कोयता गॅंग सक्रिय असून सर्रास दहशत माजवण्याचा प्रकार काही थांबायचं नाव घेत नाहीये. यावर आज पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केले.
ते म्हणाले, भाजपच्या काळात राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. पिंपरी चिंचवड शहरात कोयता गॅंग निघाली. याआधी कोयता गॅंग होती का? भाजपच याकडे लक्ष नाही. यांचा पोलीस खात्यावर वचक आणि दरारा नाही. आमच्या काळात आम्ही पोलीस खात्यात हस्तक्षेप करीत नव्हतो. कायदा आणि सुव्यवस्था चांगली ठेवा, अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली होती.
पिंपरीतील संत तुकारामनगर, मासुळकर कॉलनी, यासह पुण्यात देखील हातात कोयता घेऊन टोळक्याने दहशत माजवण्याचा प्रकार सर्रास घडत आहे. यामुळे स्थानिक दुकानदारांसह नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
















