न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२३) :- वेळोवेळी फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध आरोपी पतीने त्यांच्याशी अनैसर्गिकपणे शारिरीक संबंध ठेवले. तसेच फिर्यादीने नकार दिल्यावर फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांना मारहाण केली. जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार ऑगस्ट २०२० पासून दि. ०४/१२/२०२२ रोजी पर्यंत राहत्या घरी, आगरवाडी, ज्योतिबा मंदिराचे जवळ, चाकण येथे घडला.
फिर्यादी महिलेने आरोपी चेतन सुदाम जाधव (रा. आगरवाडी, ज्योतिबा मंदिराचे जवळ, चाकण) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी (दि. १२) रोजी २११/२०२३ भा.द.वि का कलम ३७७, ३२३, ५०६ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.















