न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च) :- शिवसेना गटनेते तथा नगरसेवक राहुल कलाटे यांची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) च्या उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.
याप्रसंगी शिवसेना व शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले व प्रदेश सचिव गणेश आहेर यांनी त्यांची भेट घेतली व त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी शिवसैनिक हनुमंत पिसाळ, मारूती म्हस्के, गणेश पाडुळे आदी उपस्थित होते.











