न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहरातील कोकणवासीयांसाठी होळी सणानिमित्त वल्लभनगर आगारामधून कोकणातील विविध मार्गांवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने ३४, पुणे जिल्ह्यामधून २८ बस सोडण्यात येणार आहेत.
होळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणासाठी बरेच नागरिक कोकणाची वाट धरतात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी ३ ते ६ मार्चपर्यंत ज्यादा बसेस सोडण्यात आल्या असल्याची माहिती विभाग नियंत्रकांनी दिली.
६ मार्च रोजी होळी आहे. तर, दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असल्याने आगारामधून दापोली, खेड, चिपळूण, गुहागर व महाड या ठिकाणी बस धावणार आहेत. यामध्ये साधी आणि शिवशाही बसचा समावेश आहे. यासाठी महामंडळाच्या संकेतस्थळावर तिकीट आरक्षणाची सोय करण्यात येणार आहे.


















