न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२३) :- ऑफिसमध्ये एकटीच असल्याचे पाहून आरोपीने फिर्यादी महिलेला पाठीमागुन मिठी मारली. तु मला खूप आवडते, असे म्हणून फिर्यादी यांचा विनयभंग केला. फिर्यादीने आरोपीला विरोध केला असता आरोपीने याबाबत कोणाला सांगीतले तर कंपनीमध्ये फ्रॉड केल्याची खोटी केस करुन अडकविन, अशी फिर्यादी यांना धमकी दिली.
तसेच आरोपीने फिर्यादी यांचा चोरुन पाठलाग केला व तु मला खुप आवडते, तु जर माझ्यासोबत रिलेशन ठेवणार नाही तर मी तुला रस्त्यामध्ये गाठून तुझ्या तोंडावर अॅसिड फेकीन अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २८/१०/२०२२) साधारण १० ते १२ दिवसांपूर्वी तसेच (दि. १३/०२/२०२३) रोजी १.३० वाजेच्या सुमारास चिंचेचा मळा, सैनिक हॉटेलच्या मागे, म्हेत्रेवस्ती, चिखली येथील अप लिफ्टो पॅकिंग सोल्युशन या कंपनीमध्ये आणि फिर्यादी यांच्या राहत्या घराजवळ घडला.
फिर्यादी महिलेने आरोपी संजय उत्तम राठोड (रा. सौभाग्य रेसीडेन्सी, फलॅट नं.०९, सेक्टर नं.१६, चिखली प्राधिकरण) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी आरोपीच्या विरोधात १०१ /२०२३ भा.दं.वि. कलम ३५४, ३५४ (ड), ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.