न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२३) :- कंपनीत काम करत असताना आरोपीने फिर्यादीचा हात धरला व जवळ ओढुन फिर्यादीच्या खांदयावर हात टाकला. तु लय चिकणी आहे, तु मला खुप आवडते, किती पैसे घेते सांग, माझ्यासोबत चल. असे म्हणत फिर्यादीचा विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. १४) रोजी दुपारी ३. ३० वाजताचे सुमारास गट नं. १०७, /१०८, ज्योतीबानगर, तळवडे, पुणे येथील जय मंगल इंड्रस्ट्रीज या कंपनीमध्ये घडली.
फिर्यादी महिलेने आरोपी किरण गायकवाड (रा. रुपीनगर, तळवडे, पुर्णनाव व पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी आरोपीवर ९९/२०२३ भादवी कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल केला असून बेड्या ठोकल्या आहेत.
















