न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२३) :- अॅपव्दारे फिर्यादीने उबेर बुक केली. राईड दरम्यान गाडी भरधाव वेगाने चालवली. फिर्यादीचे अपहरण करीत त्यांच्या जीवीताला धोका निर्माण केला. फिर्यादीला जखमी केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १) रोजी सायंकाळी ६.४५ ते ७.१५ वाजेच्या दरम्यान आर्चीड हॉटेल, बाणेर ते युनिव्हरसीटी सर्कल येथील आश्रम यादरम्यान सार्वजनीक रोडवर घडली.
महिला फिर्यादीने आरोपी उबर अॅपव्दारे बुक केलेली गाडी (एमएच १४ जीयु ९०१४) वरील ड्रायव्हर आरोपी योगेश लहानु नवाळे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी १२९/२०२३ भा.द.वि.क. ३६३,२७९,३३६ मो.वा.का. कलम १८४,११९,१७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.