न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२३) :- बंडखोर राहुल कलाटे हे अहंकाराची भाषा बोलत आहेत. त्यांना वीस हजार मते पडतील. नागरिक अहंकार स्वीकारत नाहीत असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी बंडखोर राहुल कलाटे यांच्यावर केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आले होते.
रोहित पवार म्हणाले की, नाना काटे हे प्रचंड मतांनी विजयी होतील. जगताप कुटुंबाबद्दल नागरिकांमध्ये सहानुभूती आहे. पण, भाजपाला आम्ही मत देणार नाही उलट राष्ट्रवादीला निवडून आणणार असल्याचे वातावरण नागरिकांमध्ये आहे. अजित पवार यांनी केलेला विकास हे नागरिक विसरले नाहीत. प्रदेशाध्यक्ष हे काहीही बोलले तरी खरे होणार आहे का? उलट राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येईल आणि प्रदेशाध्यक्ष यांना झटका बसेल. वंचितमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाहिले आहे. भाजपा संविधानाच्या विरोधात आहेत. तसे बघायला गेल्यास वंचित देखील भाजपा विरोधी पाहिजे. वंचित चा फायदा भाजपाला होतो हे लोकांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना कळते. त्यांचे कार्यकर्ते हुशार आहेत. भाजपाला मदत होईल असे काम ते करतील असे मला वाटत नाही
















