न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२३) :- कंपनीत येवुन सिक्युरीटी गार्ड दिलनवाज मोहमद खान याला धमकी दिली. आरोपींनी चाकुचा धाक दाखवुन कंपनीचे गेट उघडुन दुसरा सिक्युरीटी गार्ड नामदेव मरीबा भोगे यालाही धमकी दिली. त्यांना दोरीने बांधुन छोटा हत्ती टेम्पोमध्ये कंपनीतील स्टेनलेस स्टील ७०० किलो व माईलड स्टील १०० किलो असे एकुण ८०० किलो स्क्रॅप अंदाजे किंमत ९१,३०० रुपयांचा स्क्रॅपचा माल चाकुचा धाक दाखवुन बळजबरीने टेम्पोत भरून चोरी करून नेला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी गोरक्षनाथ गोविंद गायकवाड (वय ३६, व्यवसाय खाजगी नोकरी, रा.कुरुळी, खेड) यांनी आरोपी पाच ते सहा अनोळखी इसम (नाव पत्ता माहित नाही), दिलनवाज मोहंमद शफीखान (वय ५४ वर्षे, धंदा सिक्युरीटी गार्ड, रा. कैथी थाना, शिवसागर, जि. रोहतास, बिहार, सध्या – रा. बीएसएनएल टॉवर जवळ भागीरथी कॉम्प्लेक्सचे मागे, बिरदवडी, खेड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार (दि. १७) पहाटे २.०० वाजेच्या सुमारास दाबडमळा, चाकण येथील टेक्नोड्राय सिस्टीम इंजिनिअरिंग प्रा. लि. या कंपनीमध्ये घडला. चाकण पोलिसांनी आरोपीच्या विरोधात २२४/२०२३ भा.द.वि क ३९५,१२० (ब) नुसार गुन्हा दाखल केला असून एकाला बेड्या ठोकल्या आहेत.
















