न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२३) :- राहत्या घराची घरझडती घेण्यासाठी फिर्यादी व त्यांचे वरिष्ठ अधिकारी व इतर स्टाफ पंच व पोलीस गेले होते. दरम्यान आरोपीच्या मुलांनी व महिलेने शासकीय कामात अडथळा आणला. त्यांना फलॅटची घरझडती करू दिली नाही. तसेच फलॅटचा एका रूमचा दरवाजा बंद करून रूमची झडती घेण्यापासून परावृत्त केले आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी नुतन श्रीकांत भोसले (वय ५३ वर्षे धंदा नोकरी, सहकारी अधिकारी श्रेणी-२ सहकारी संस्था पुणे शहर -२ कार्यालय- टिळक रोड क्षेत्रीय कार्यालय दुसरा मजला टिळक रोड पुणे) यांनी आरोपी महिला आरोपी, तनिष मनिष कासलीवाल, महिला आरोपी (सर्व रा.प्लॅट नं. ५०१, पॅनोरमा बिल्डींग मोहनगर, ग्रीन झोन अपार्टमेंट समोर बाणेर) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार (दि. १७) रोजी सकाळी १०.०५ वा. ते २.३० वाजेच्या दरम्यान प्लॅट नं. ५०१, पॅनोरमा बिल्डींग, मोहनगर, ग्रीन झोन अपार्टमेंट समोर, बाणेर येथे घडला. हिंजवडी पोलिसांनी १३४/२०२३ भा.द.वि. कलम ३५३,३४०,३४ नुसार तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















