न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२३) :- पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरून संगनमताने फिर्यादी व साक्षीदार यांना आरोपींनी बोलावून घेतले. त्यांना लोखंडी कोयत्याने व सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. फिर्यादीचा चुलत भाऊ जाहिद सय्यद यास गंभीर जखमी करीत साक्षीदार कुमार कांबळे यास जखमी केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी शाहरूख हमीदअली सय्यद (वय ३० वर्षे, धंदा व्यवसाय, रा. पंचतारानगर, दया अपार्टमेंट, फ्लॅट नं. २१. आकुर्डी गावठाण) यांनी आरोपी आतिफ ऊर्फ आत्तुखान (वय अंदाजे २० वर्षे, सध्या रा. चिखली), शादाब खान (वय अंदाजे २० वर्षे, रा. काळभोरनगर, चिंचवड), चेतराज जोशी (वय ३० वर्षे, रा. सदर) व इतर एकजण यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
ही घटना (दि. १६) रोजी रात्री ८.०० च्या सुमारास सुनिल दोरगे चौक, काळभोरनगर, चिंचवड येथील सार्वजनिक रस्त्यावर घडली. पिंपरी पोलिसांनी १९५/२०२३, भादंवि कलम ३२६, ३२४, ३२३, ३४, भारतीय हत्यार कायदा कलम ४, २७, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करीत तिघांना अटक केली आहे.
















