न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२३) :- वेळोवेळी आर्थिक मदत फिर्यादीने आरोपीला केली होती. त्याची जाणीव ठेवुन आरोपीने फिर्यादीला मिळकतीमध्ये बांधण्यात येणा-या कृष्णाई अपार्टमेंट या इमारतीमधील दुस-या मजल्यावरील फ्लॅट क्र. २०३ हा बक्षीसपत्र करून दिला.
दरम्यान आरोपीने हा फ्लॅट संतोष यशवंत कापसे यांना परस्पर डीड ऑफ असाईनमेंट लिहुन देत फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि.२८/१२/२०१७ पासुन ते दि.१३/११/२०१९) रोजी पर्यंत प्लॅट नं २०३, कृष्णाई अपार्टमेंट, पिंपरी वाघिरे येथे घडली. फिर्यादी बाळासाहेब प्रभाकर काटे (वय ३६ वर्ष, रा. विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर) यांनी आरोपी ब्रम्हदेव बापुराव गायकवाड (वय ३७ वर्ष, रा. भालेकरनगर, पिंपळे गुरव) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपी विरोधात २०७/२०२३, भा.दं.वि. कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.












