न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२३) :- ‘पक्षात माझी मोठ्या प्रमाणावर घुसमट होत असे आहे’, असे म्हणत सचिन साठे यांनी नुकताच प्रदेश सचिवपदासह प्राथमिक काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
‘पक्षाकडून होणारी माझी उपेक्षा मी सहन करू शकत नाही’, असे त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिलेल्या राजीनाम्यात नमूद केले आहे.
सचिन साठे हे २६ वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे काम करत आहेत. त्यामुळे पक्ष श्रेष्ठी साठे यांचा राजीनामा स्वीकारणार? की त्यांची नाराजी दूर केली जाणार याकडे कॉंग्रेसजणांच्या नजर खिळल्या आहेत.













