न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२३) :- वडगाव मावळ येथील न्यायालयात वडगाव मावळ बार असोसिएशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज्यांची ३९३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
न्यायालयाच्या दालनात वडगाव मावळ बार असोसिएशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन करून अॅड. रवींद्र यादव यांचे व्याख्यान झाले. तसेच (दि. २०) रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुपारी २ वाजता “छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची न्याय व्यवस्था” या विषयावर डॉ. प्रमोद बोराडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या व्याख्यानास वडगाव मावळ येथील न्यायालयातील मा. न्यायाधीश तसेच प्रंचड संख्येने वकील बांधव, अॅड. रवी विनोदे व भगिनी व पक्षकार उपस्थीत होते.
डॉ. प्रमोद बोराडे यांनी इतिहासातील दाखले देत व शिवकालीन पत्रांचा संदर्भ देत छत्रपती शिवाजी महाराजांचा न्यायादान पध्दतीचा इतिहास अतिशय सुंदर रितीने सर्वांसमोर मांडला.
या व्याख्यानाचे आयोजन मावळ वकील बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. संजय वांद्रे व त्यांचे सर्व सहकारी यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. विनय दाभाडे यांनी केले.













