न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२३) :- फलटन येथून कळंबोली, मुंबई येथे जाण्यासाठी फिर्यादी या एसटी (एमएच१४बीटी४७७१) बसने प्रवास करीत होत्या. उर्से टोलनाका येथे बस आली असता आरोपीने फिर्यादीच्या शेजारी बसून झोपेचे सोंग केले. अश्लील वर्तवणूक करीत फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी महिलेने आरोपी चंद्रकांत भिकाजी जाधव (वय ४४ वर्षे, धंदा नोकरी, रा. गोवंडी, लिंबोनी बाग, रूम नं. ११६, मुंबई) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
ही घटना (दि. २१) रोजी पहाटे १.३० च्या सुमारास पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे उर्से टोलनाक्याजवळ घडला. शिरगाव पोलिसांनी आरोपी विरोधात ४०/२०२३ भा.द.वि.क. ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.













