- भर चौकात महिलेशी अश्लील वर्तन करीत मारहाण व विनयभंग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२३) :- दुचाकीवरून फिर्यादी या पुण्याहुन त्यांच्या घरी येत होत्या. दरम्यान चौकात भर रस्त्यातच टेम्पो उभा होता व ट्रॅफिक जाम होते. रस्त्यावर खोदकाम चालु होते. स्पीकरही जोरात चालु होता. त्यावेळी फिर्यादीने गाडी थांबवुन तेथील आरोपी तिघांना ‘तुम्ही स्पीकर बंद करा व तुमचा टेम्पो थोडा बाजुला लावा’ असे सांगीतले. त्यावेळी आरोपी व सह आरोपी २ यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘तुझ्या बापाचा रोड आहे?, आम्ही रोज येथे येणार’ असे म्हणत फिर्यादी यांना ढकलले व पुढे जा, तसेच ‘मी कोथरुडचा आहे, कोयता गँगचा आहे, पोलीस आमचं काही वाकडं करणार नाही’ असेही म्हणाले. फिर्यादीने १०० नंबरला फोन केला व पोलीस येईपर्यंत फिर्यादी या बिल्डींगखाली दारात खुर्चीवर बसल्या. त्यावेळी फिर्यादीने जवळील कांबळे, टायरवाला अबताफ व फिर्यादीचे पती यांना घडला प्रकार सांगितला. त्यावेळी समोरुन गेटच्या आत सह आरोपी २ याने त्याची दुचाकी फिर्यादीच्या थेट अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्याने फिर्यादीला लाथ मारली. त्यावेळी फिर्यादी या खुर्चीवरून खाली पडल्या. त्यावेळी त्यांच्या गुड घ्याला व उजव्या हाताच्या कोपराला मार लागला. आरोपीने हाताने फिर्यादीच्या अवघड जागेवर हात लावुन त्यांना अश्लील शब्द वापरले. फिर्यादीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन त्यांना घाणघाण शिवीगीळ केली व हातवारे करुन, ‘तु भिकारी आहेस, मी मुळशीचा असुन मी कोयता गँगचा आहे, मी ७-८ वेळी आत गेलो असून माझं कोणी वाकडे करु शकत नाही, तुला जीवे मारुन टाकतो’, अशी धमकी देत आरोपी गाडी घेऊन तिथून निघुन गेला.
याप्रकरणी महिला फिर्यादी यांनी आरोपी तुषार कोकरे, नितीन कोकरे, त्यांचे इतर दोन साथिदार (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार (दि. १२) रोजी सायंकाळी ७.०० वाजेच्या सुमारास वाडकर चौक, रस्त्यावर हिंजवडी येथे घडला. हिंजवडी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात १३९/२०२३ भा.दं.वि. कलम ३५४, ३५४- २७९, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.













