न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२३) :- महाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हा रजि नंबर १९/२०२३ भा.द.वि. कलम ४५४, ३८०, ३४ दाखल आहे. या तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलीस आरोपीला ताब्यात घेत होते. त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपीला पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवले. कायदेशीरपणे आरोपीला ताब्यात घेत असताना फिर्यादी करीत असलेल्या शासकीय कामात आरोपीने अडथळा निर्माण केला. स्वतःची अटक टाळण्यासाठी जाणीवपुर्वक फिर्यादीच्या अंगावर धावुन त्यांना हाताने धक्का देवून, स्वतः जवळील ब्लेड हातामध्ये घेवुन ते फिर्यादीच्या चेहऱ्यावर मारण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘मला पकडले तर तुम्हाला दाखवितो, मी आत्महत्या करतो’ असे बोलून स्वतःच्या हातावर आरोपीने ब्लेडने वार करुन घेतला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. २१) रोजी दुपारी ३:१५ वाजेच्या सुमारास मुंबई पुणे जुना हायवे रोडवर, सेंट्रल चौक, देहुरोड येथे घडला. फिर्यादी संतोष रामदास काळे (वय ३५ वर्ष, व्यवसाय नोकरी, राहणार आराध्या बिल्डींग, फ्लॅट नंबर ७०३, देहुगाव) यांनी आरोपी जलसिंग राजपुतसिंग दुधानी (वय ३५ वर्ष, राहणार जांभुळगाव, ता मावळ जि पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
देहुरोड पोलिसांनी आरोपी विरोधात १४९/२०२३ भा.द.वि.क., ३५३,३०९३५२,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी ससून हॉस्पीटल येथे अॅडमीट आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.













