न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२३) :- हॉटेलमध्ये जेवणाचे पार्सल आणण्यासाठी फिर्यादी व त्याचा मित्र गेले होते. तिथे सह आरोपी २ व ३ यांचा फिर्यादी यांना धक्का लागला. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ वादावादी झाली. त्या कारणावरुन चिडुन चौघांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रास दगडाने व हाताने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि.२०) रोजी रात्री ११.३० ते ११.४५ च्या दरम्यान दर्शननगरीसमोर, चिंचवड, सरोवर हॉटेल, काळेवाडी पुलाजवळ घडली. फिर्यादी ओमकार संभाजी खेडकर (वय २२ वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा. हिरा राजा सोसायटी, प्लॅट नं. ए-४, तानाजीनगर, चिंचवड) यांनी प्रणव ऊर्फ पिल्या कांबळे, शुभम चंद्रकांत कळमकर, पार्थ मांडवकर, आदित्य ऊर्फ भद्रया चव्हाण (सर्व राहणार, चिंचवड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी चौघांच्या विरोधात ८२/२०२३ भा.द.विकलम ३२४, ३२३, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.













