न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२३) :- भरधाव वेगात आरोपीने पल्सर (एमएच२२एव्ही६८६६) दुचाकी चालवली. समोरुन येणाऱ्या स्प्लेंडरला (एमएच१४ एचएल १९९१) जोरात धडक दिली. अपघातात फिर्यादी यांचा मेहुणा स्प्लेंडर वरील चालक गंभीर जखमी झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मयूर मारुती बोंबले (वय २८ वर्षे, सध्या रा. येलवाडी ता. खेड) असे अपघातात मृत्युमुखी झालेल्या तरुणाचे नाव आहे. दोन्ही वाहनांचे अपघातात नुकसान झाले. या अपघाताला आरोपी कारणीभूत ठरला.
फिर्यादी घनशाम बाळसाहेब गाडे (वय, ३५ वर्षे, धंदा-शेती, रा. येलवाडी ता. खेड, जि. पुणे) यांनी आरोपी बळीराम शिवाजी देवकाते (रा. देहुगांव ता. हवेली जि. पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
ही घटना (दि. २०) रोजी रोजी रात्री ८:४५ वाजता खालुंम्ब्रे ता. खेड जि. पुणे गावच्या हद्दीत ह्युंदाई ते खालुंम्ब्रे रस्त्यावर घडली. म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी विरोधात ३५/२०२३.भा.द.वि. कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ मो.वा.का. कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.













