न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२३) :- कंपनीतील फिर्यादीच्या मालकीच्या अंदाजे रक्कम दोन कोटींच्या २१ मशीन आरोपीच्या शेडमध्ये होत्या. त्यानंतर फिर्यादी कंपनीतील त्यांच्या मालकीच्या मशीन पाहवयास गेले असता त्या मशीन कंपनीच्या शेडच्या बाहेर ताडपत्रीने झाकलेल्या त्यांना आढळल्या. त्यानंतर फिर्यादीला त्या मशीन त्या ठिकाणी मिळुन आल्या नाहीत. मशीनरीबातत आरोपीकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे शेडचा आरोपी मालक यानेच फिर्यादीच्या कंपनीच्या २१ मशीन कोणाला तरी विक्री करुन फिर्यादी यांचा विश्वासघात केला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. ३१/११/२०२२ रोजी ते दि. ०१/०२/२०२३) दरम्यान टच ईलॅस्टिक्स या कंपनीमध्ये वाघजाई नगर, खराबवाडी, ता. खेड येथे घडला.
फिर्यादी प्रसनजित शितलचंद्र दास (वय ४८ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. ए १ / १०१ मनीष गार्डन, अण्णासाहेब मगर मैदानासमोर, पिंपरी) यांनी आरोपी गणेश संभाजी माळी (रा. न्यु वृंदावन कॉ. हौसींग सोसायटी, शिवाजीनगर, पुणे) याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी विरोधात म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ३६/२०२३, भा.द.वि. कलम ४०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















