न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२३) :- लग्नानंतर सासरी नांदत असतांना लग्नानंतर एका महिन्यानंतर फिर्यादी यांच्या नव-याने फिर्यादी यांना पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये अॅडमिशन घेवुन दिले. फिर्यादी यांच्या आरोपी सासुबाई यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच कोकणे चौकात राहत असताना सह आरोपी आरोपी पतीला ‘तुझ्या बायकोने तुला वेगळे राहायला लावले आहे, तर तु तिला नांदवुन का देतो, तिला घरातुन हाकलुन दे, असे म्हणुन आरोपी व फिर्यादी यांच्यामध्ये भांडण लावुन दिली. त्यामुळे आरोपी पती हा सह आरोपीचे ऐकुण फिर्यादी यांना रोज दारु पिवुन मारहाण करुन शिवीगाळ करुन त्रास देत होता. तसेच फिर्यादी यांचे पती काहीही काम करीत नसल्याने ‘तुम्ही कामावर जा, नाहीतर मला तरी कामावर जावु दया, घर खर्चासाठी पैसे दया, असे म्हणाल्याने फिर्यादीच्या चारीत्र्यावर संशय घेवुन रोज दारु पिवुन फिर्यादी यांना मारहाण करुन शिवीगाळ केली आहे. आरोपींनी आप-आपसात संगणमत करुन फिर्यादी यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देवून त्यांचा छळ केला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना फेब्रुवारी २०१८ पासुन ते दि. २०/०२/२०२३ दरम्यान के/आफॅ-विलास पाटील, हरिओम कॉलनी, चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.
महिला फिर्यादीने आरोपी नवरा योगेश अशोक मोरे (वय-३४ वर्षे, धंदा- मजुरी, सध्या रा. के/आफॅ-विलास पाटील, हरिओम कॉलनी, चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड, मुळ रा. गोलखेल रोड, आरोग्वकॉलनी, मु पो. शेगाव, ता. शेगाव, जि. बुलढाना), महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी आरोपी दोघांच्या विरोधात ९०/२०२३. भादवि कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.


















