- पालिकेत संत गाडगेबाबा जयंती साजरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२३) :- संत गाडगेबाबा यांची किर्तने म्हणजे लोकप्रबोधनाची माध्यमे असत, भजन किर्तनाच्या माध्यमातून अज्ञान, अस्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मुलनासाठी अखंड परिश्रम घेणारे मानवतावादी संत गाडगेबाबा हे थोर समाजसुधारक होते असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आणि उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त वाघ
बोलत होते.
यावेळी जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते संतोष भालेकर ,सागर पवार, संतोष जोगदंड, भाई विशाल जाधव, संतोष कदम, पोर्णिमाकदम, दिपा भालेकर, कल्पना गायकवाड, अशोक हिंगे पाटील, बबन वडमारे, बाळाजी जगतकर, ज्ञानेश्वर कवंठेकर, निखील दळवी आदी उपस्थित होते.
संत गाडगेबाबांनी अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, विद्यालये सुरु केली. त्यांच्या नावाने शासन स्तरावर संत गाडगेबाबा
स्वच्छता अभियान देखील सुरु आहे. संत गाडगेबाबा यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.


















