न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२३) :- थेरगावातील कै. शंकरराव गावडे सभागृह येथे चिंचवड पोटनिवडणुकीसाठी कार्यालय करण्यात आले आहे. या कार्यालयातून शनिवारी अधिकारी व कर्मचारी मतदान साहित्य मतदान केंद्रावर घेवून जाण्यासाठी येणार आहेत. या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका यांना मुभा असणार आहे. दरम्यान तापकीर चौक ते थेरगाव पोलीस चौकीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग तापकीर चौकातून जाणारी वाहने धनगरबाबा मंदिर व काळेवाडी फाटा मार्ग येथून जाऊ शकतात. थेरगाव पोलीस चौकीकडे येणारी वाहतूक ही बारणे कॉर्नरवरून डांगे चौक व बिर्ला चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी केले आहे.


















