न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरीत वकिलाला मारहाण करून रोकड लुटल्याचा प्रकार घडला आहे. त्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याउलट महिलेने वकिलाच्या विरोधात मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याची फिर्याद नोंदविली आहे.
बळजबरीने फिर्यादीच्या शर्टच्या खिशातून ५००० रुपये रोख रक्कम काढुन घेतली. आरोपी तिघांनी फिर्यादीला अश्लिल शिवीगाळ करुन हाताने मारहान करीत दमदाटी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. २३) रोजी दुपारी २.४५ वाजता मोरवाडी कोर्टाच्या मेन गेटवर, पिंपरी येथे घडली.
फिर्यादी राजेश रमेश रणपिसे (वय ३० वर्ष, व्यवसाय वकील, रा. बिजलीनगर, गिरीराज कॉम्प्लेक्स, के बिल्डींग, फ्लॅट नं. १, चिंचवड) यांनी महिला आरोपी, निलेश गणगे, रोहीत परीहार (सर्व रा. काळेवाडी) व त्यांचा एक अनोळखी साथीदार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपींविरोधात २३३/२०२३ भा. दं. वि. संहिता कलम ३९२, ३२३, ५०६, ५०४,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याउलट महिलेने दुसरी फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादी यांना वकीलांच्या बारमध्ये चर्चा करण्यासाठी बोलावुन घेतले. फिर्यादीला मारण्याची धमकी देत ‘ ये आयघाले तु येथून निघून जा. नाहीतर तुला मारेल. तुमच्या दोघांना बघुन घेईल. मला काय करायचे आहे ते मी बरोबर करेल ‘ अशी धमकी देत ‘चांभारांच काम चप्पल शिवायच आहे. तु चप्पलच शिव वकीली नको करुस’ असे बोलून फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ करुन अपमानास्पद बोलला, असं फिर्यादीत म्हटलं आहे.
ही घटना (दि. २३) रोजी दुपारी ४.०० वाजेच्या दरम्यान मोरवाडी कोर्टात वकीलांची बार रुम, पिंपरी येथे घडली. महिला फिर्यादीने आरोपी राजेश रमेश रणपिसे (वय अंदाजे ३० वर्षे, रा. बिजलीनगर, चिंचवड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी २४१/२०२३ भा.दं.वि. कलम ५०४, ५०६, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध ) अधिनियम-१९८९ कलम ३ (१) (आर) (एस) नुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.












