न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२३) :- कंपनीमध्ये काम करत असताना कंपनीतील कामगार आरोपी सतत फिर्यादीजवळ जाऊ लागला. त्यांच्या अंगाला हात लावुन, अश्लील बोलत ‘ तुझा नवरा कोठे आहे, तो गे होता का?’ असे म्हणत फिर्यादीकडे शारिरीक संबंधाची मागणी केली. तसेच दुसऱ्या आरोपीने देखिल फिर्यादी जवळ जाऊन व अश्लील बोलून ‘तुला बॉयफ्रेंड आहे काय? तु रुम करुन का राहात नाही, असे सतत विचारुन फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न करुन फिर्यादीचा विनयभंग केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना सप्टेंबर २०२२ च्या तिस-या व चौथ्या आठवडयात एक्सप्रेस अॅनॅल्टीक्ल्स या कंपनीच्या ऑफीसमध्ये वाकड रोड, व्हाईट स्केअर बिल्डींग येथे घडली.
महिला फिर्यादी यांनी आरोपी प्रतिक भुरके (वय ३० वर्षे अंदाजे रा. वाकड), प्रसन्ना चिदानंद (वय ३२, रा. चिंचवड) या दोघांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. हिंजवडी पोलिसांनी दोघा आरोपींच्या विरोधात १४८/२०२३ भा.द.वि कलम ३५४ अ. ५०९, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.












