न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२३) :- कंपनीच्या वॉल कंपाउंड वरुन आरोपी आत आले. बाथरुम जवळील ग्रीलच्या दरवाजातून कंपनीत प्रवेश केला. आतील १५०० किलोचे स्टेनलेस स्टीलचे ३० जॉब, त्याची किमत २०० रुपये प्रति कीलो असे एकुण ३,००,००० रुपये किंमतीच्या जॉबची चोरी केली.
ही घटना (दि. १७) रोजी मध्यरात्री ३.०० ते ४.०० वाजेच्या दरम्यान सावरदरी येथील वासुली फाटा, मेगाइ पी सी प्रोजेक्टस् प्रा. लि. या कंपनीमध्ये घडली.
फिर्यादी ऐनुल हबीब हारुण इनामदार (वय ३६ वर्ष, व्यवसाय नोकरी, रा. चिंचवड, कृष्णानगर, चिखली, मूळ रा. जुन्नर, एस टी स्टॅन्डचे मागे, जुन्नर) यांनी आरोपी दोन अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ४४/२०२३ भादवि कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे.












