- हॉटेल, ढाबे, लॉजेस, दुकाने, पानटप-या व इतर आस्थापना राहणार बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२३) :- २०५ – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे मतदान उद्या (दि. २६) रोजी होणार आहे. ही पोटनिवडणुक शांततेत व सुरळीत तसेच भयमुक्त वातावरणात होईल.
यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता (सी.आर.पी.सी.) १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील हॉटेल, ढाबे, लॉजेस, दुकाने, पानटप-या व इतर सर्व आस्थापना (अत्यावश्यक सेवा वगळून) (दि. २५) रोजी रात्री १०.०० वाजेपासून ते (दि. २६) सकाळी ७.०० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलीसांकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात दिली आहे.












