न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२३) :- ‘माझ्यासोबत मैत्री कर’, असे आरोपी फिर्यादीच्या मुलीला म्हणाला. त्याला मुलीने नकार दिला. त्यामुळे आरोपी फिर्यादीच्या मुलीचा वारंवार पाठलाग करत आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार मागील दोन महिन्यांपासून ते २५/०२/२०२३ पर्यंत दुपारी २.३० च्या सुमारास न्यु इंग्लीश स्कुल ज्युनिअर कॉलेज, म्हातोबा मंदीराच्या जवळ, हिंजवडी येथे घडला.
१६ वर्षीय मुलीच्या आईने आरोपी रोहन सगर (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपी विरोधात १५७/२०२३ भा.दं.वि. कलम ३५४ ड सह सह बाललैंगीक अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम ११,१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.












