न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२३) :- घरासमोरील रस्त्यावर दुचाकी व काळ्या रंगाच्या फॉर्चूनर कार (एमएच१४जेपी१२१२) मधुन सहाजण आले. त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवुन फिर्यादीचे पती व दोन मुले यांना फिर्यादीचे पती मतदारांना पैसे वाटत होते, या संशयावरुन शिवीगाळ व दमदाटी केली. लाथाबुक्याने मारहाण करीत त्यांना जखमी केले. तसेच फिर्यादी व त्यांची सवत फिर्यादीच्या पतीचा व मुलाचा बचाव करण्यासाठी गेलो असता आरोपी दोघांनी दोघींनाही मारहाण करुन अश्लिल शिवीगाळ करीत त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले आहे.
ही घटना (दि २५) रोजी पहाटे ३.३० च्या सुमारास सर्व्हे नं.३६/२, डी ५, मथुरा कॉलनी, कृष्णा सोसायटी, रहाटणी येथे घडली.
महिला फिर्यादी यांनी आरोपी ऋतीक गोविंद काटे (वय २३ वर्षे, रा. शिवआंगण सोसायटी, बंगला नं ०१, काटेनगर, पिंपळे सौदागर), राकेश दिलीप काळे (वय ३३ वर्षे, रा. सर्व्हे नं १४४, घावटेवस्ती, मांजरी बुद्रुक, हडपसर), हर्षल शंकर काटे (वय २९ वर्षे रा. स्वामी बंगला, काटेनगर पिंपळे सौदागर, सांगवी), इतर दोन ते तीन अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी १९६/२०२३ भा.द.वि. कलम ३५४ (अ), ३२४,१४३, १४७,५०४, ५०६,१८८ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३)/१३५ नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून निष्पन्न आरोपी भानुदास गणेश काटे (वय २५ वर्षे रा. विश्वशांती कॉलनी, समिक्षा सुपर मार्केट पिंपळे सौदागर सांगवी), विशाल चंद्रकांत जगताप (वय ३३ वर्षे रा. सर्व्हे नं ५१, काळेपडळ, हडपसर) यांना अटक केली आहे.












