न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२३) :- दाखल केसमध्ये मदत करतो, असे म्हणत फिर्यादीला प्रथम हाय, हॅलो, गुडमॉर्निंग, गुड नाईट असे मेसेजेस केले. त्यानंतर फिर्यादी या घरी असताना फिर्यादीस व्हाटसअप नंबरवर अश्लिल मेसेजेस केले. तसेच मेसेजद्वारे व्हास्टअप कॉल व फोन कॉल करुन फिर्यादीकडे शरीरसुखाची मागणी केली. फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. फिर्यादीला माझी पोलीस स्टेशनला ओळख आहे, तुझ्यावर केस करतो, तुझे स्टेटस ठेवतो, असे म्हणुन फिर्यादीस वारंवार धमकी देवून व अश्लील शिवीगाळ केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २/७/२०२२) रोजी रात्री ११.३० ते (दि. ०२/०२/२०२३) रोजी दुपारी ४.०० वाजता निगडी प्राधीकरण, येथील सॅक्टर नंबर ३ मध्ये घडला.
महिला फिर्यादीने आरोपी रमेश दशरथ वाघदरे (वय ४२ वर्ष, रा. पडाळवाडी खेड, पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपीविरोधात ६६/२०२३ भा.दं.वि. कलम ३५४(अ), ५०६,५०४, माहिती तंत्रज्ञान अधि ६७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.












