न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२३) :- आईने स्वतः खरेदी केलेली प्रापर्टी बक्षीसपत्राने फिर्यादी मुलीच्या नावे केली. त्यांनी काढलेल्या एलआयसीवर वारसदार म्हणून फिर्यादी मुलीचे नाव लावलेले आहे. फिर्यादी यांची आई मयत झालेली आहे. दरम्यान फिर्यादीचे वडील आणि भाऊ हे दोघे आरोपी फिर्यादीच्या घरासमोर आले. त्यांनी फिर्यादीला एलआयसीच्या कागदपञावर तसेच प्रॉपटीच्या कागदावर सहया कधी करणार, असे म्हणत वाईट शिवीगाळ केली. फिर्यादी व त्यांची मूलगी दरवाजासमोर उभ्या असताना दोघांनीही फिर्यादी व त्यांच्या मूलीला ढकलून दिले. आरोपीने फिर्यादी यांचा हात पिरगाळून जबरदस्तीने फिर्यादीच्या घरात घूसून घरातील टेबल तसेच साहीत्य घरामध्ये फेकून देत फिर्यादीस शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केली. ‘तू जर एलआयसीवर सहया केल्या नाही, तर तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली.
हा प्रकार (दि. २४) रोजी दुपारी ९.४० वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या राहात्या घरी, सुभाषवाडी, खेड जि. पूणे येथे घडला.
महिला फिर्यादीने आरोपी अशोक संतोष सोनवणे (वय ७० वर्षे), गुणवंत अशोक सोनवणे (वय ३७, दोघे रा. सुभाषवाडी, निघोजे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दोघांच्या विरोधात ५२ / २०२३ भा.द.वि.स कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.












