न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२३) :- भाडेतत्त्वावर नेलेली साडेचार लाखांची विटारा ब्रेजा कार फिर्यादीने आरोपीकडे विश्वासाने सोपविली. नेलेली कार परत न देता कारचा अपहार करुन फिर्यादी यांची फसवणुक केली आहे.
ही घटना (दि. २) रोजी दुपारी ३.०० च्या सुमारास फिर्यादीच्या रहात्या घराजवळुन, ए-२०१, स्पिरीया सोसायटी, हिंजवडी येथे घडली.
फिर्यादी समीर निवृत्ती मरे (वय-३१ वर्षे, धंदा-व्यवसाय, रा. ए-२०१. स्पिरीया सोसायटी) यांनी आरोपी भुषण रजिकांत निकम (रा. प्लॉट नं. ७०/७३/१ बी, ओमकार कॉलनी, काकासाहेब म्हस्के कॉलेज रोड, अहमदनगर) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपी विरोधात १५६/२०२३ भा.दं.वि. कलम ४०६, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


















