न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२३) :- आज रविवारी चिंचवड पोटनिवडणूकीसाठी मतदान होत आहे. त्याला गालबोट लागण्याचा प्रकार घडला. बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंचे समर्थक आणि भाजपाचे माजी नगरसेवक एकमेकांना भिडले.
काही काळ यामुळे तणाव निर्माण झाला होता. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी हा वाद मिटवला. यानंतर मात्र पोलिसांनी अधिकची कुमक मागवली होती. चिंचवड विधानसभा मतदारसंघात १३ संवेदनशील मतदारसंघ असून तिथं देखील मोठा पोलीस फाटा आहे.
पिंपळे गुरवच्या ३५३ आणि ३५४ मतदान केंद्रावर बंडखोर राहुल कलाटे यांचे समर्थक आणि भाजपाचे माजी नगरसेवक सागर आंगोळकर एकमेकांमध्ये भिडले. यामुळं काही काळ तणावाचे वातावरणात होतं. पोलिसांनी मध्यस्थी करत दोघांची हाणामारी सोडवली. चिंचवडमध्ये आज पोटनिवडणूकीसाठी मतदान पार पडत आहे. दुपारी तीन पर्यंत ३०.५५ टक्के मतदान झाले आहे.


















