न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२३) :- बंडगार्डनहून राजगुरुनगरच्या दिशेने फिर्यादी त्यांच्या होन्डा कंपनीच्या (एमएच१४एफआर२४४५) दुचाकीवरून जात होते. दरम्यान पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला चौघांनी रस्त्यात थांबवले. त्यांना अंधारात नेवून त्यांच्याकडील ३०,७०० रुपये रोख व पाकीटातील लायसन्स, आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच फेडरल व शरद बँक यांचे दोन्ही एटीएम काढून घेतले. त्यांना हातापायाने मारहाण केली. लुटमार करून आरोपी काळ्या रंगाची पल्सर व आणखी एका दुचाकीवरून पळून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २५) रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास संतोषनगर, वाकी, खेड जि. पुणे येथे समाधान हॉटेलच्या पुढे नाशिक रस्त्यावर घडला.
फिर्यादी प्रविण ज्ञानेश्वर सांडभोर (वय ४७ वर्षे, रा. जय गणेश सोसायटी, फलॅट नं. ६, दुसरा मजला, वृंदावन सोसायटीजवळ राजगुरुनगर ता.खेड, जि. पुणे) यांनी आरोपी चार जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी चौघांच्या विरोधात २५४ / २०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


















