न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२३) :- मित्राच्या वाढदिवसाचा केक आणण्यासाठी फिर्यादी दुचाकीवरुन जात होते. दरम्यान सोसायटीसमोर अनोळखी दोघांनी फिर्यादीच्या दुचाकीला दगड मारला. त्यांना जमिनीवर पाडले. त्यांच्याकडील पाच हजारांचा मोबाईल फोन व पाच हजारांची दुचाकी (एमएच१०एचए३२०४) असा एकुण दहा हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २५/) रोजी रात्री १०.३० च्या सुमारास फाउंटन मार्केट, फेज ३, हिंजवडी यु ५७ या सोसायटीसमोर घडला.
फिर्यादी वैभव वाघजी बेले (वय १८ वर्षे, धंदा हाऊसकिपिंग, रा. भोईरवाडी, सुधीर भोईर यांची खोली, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी आरोपी दोन अनोळखी इसमांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी १६०/२०२३ भादवि कलम ३९२ ३३६ ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















