न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२३) :- ओळखीच्या इसमाने फिर्यादी महिलेच्या संमतीशिवाय जबरदस्तीने शारिरीक संबंध निर्माण केले. ‘मी तुझ्याशी विवाह करतो, मी जबरदस्ती केली, हे कोणाला सांगु नको, असे वचन दिले. वांरवार फिर्यादीसोबत विविध ठिकाणी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातुन फिर्यादी गरोदर राहील्या. गर्भपातासाठी आरोपीने गोळया आणून दिल्या, त्यामुळे त्यांचा गर्भपात झाला. तसेच फिर्यादीचा विश्वास संपादन करीत २०१६ ते २८/१२/२०२२ पर्यंत फिर्यादीकडुन सुमारे ६,००,००० लाख रुपये आरोपीने घेतले व ते तिला परत केले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ९/९/२०१९ ते दि २८/१२/२०२२) टिंसेल कांउटी, हिंजवडी, मारुजी, काळेवाडी येथे घडला.
महिला फिर्यादीने आरोपी सिध्दार्थ त्रिपाठी (वय ३८ वर्षे, रा. वार्ड नं ६, तांदळाच्या पिठाच्या गीरणीजवळ, विक्रमपुर, इमली बुडार, सोहागपुर, मध्य प्रदेश याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी १६२/२०२३ भादवि कलम ३७६ (२) (एन३१२, ४०६,५०६ प्रमाणे आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















