न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२३) :- आम आदमी पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्यावरील निलंबनाची कारवाई पक्षाने रद्द केली आहे. याबाबतची माहिती आपचे राज्य प्रभारी हरिभाऊ राठोड यांनी दिली.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील ‘आप’चे अधिकृत उमेदवार मनोहर पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा ठपका ठेवत चेतन बेंद्रे यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. दरम्यान बेंद्रे यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे.
















