न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२३) :- मोशीतील संघर्ष कॉलनी येथे बुधवारी (दि. २) रोजी सायंकाळी ७ वाजता संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९३ व्या जयंतीनिम्मित ह.भ.प माउली महाराज पठाडे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
दरम्यान कोरोनाच्या महाभयंकर काळामध्ये सामाजिक सेवा दिलेल्या कार्यकर्त्यांच्या आई वडिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच विद्युत पुरवठा कर्मचारी, महापालिकेचे सफाई कामगार, पाणी पुरवठा कामगार यांच्या उत्कृष्ठ सेवेबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक न काढता समाजामध्ये जागृती व्हावी या हेतूने कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे. मोशी परिसरातील शिवभक्तांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संघर्ष मित्र मंडळाचे अध्यक्ष चेतन माने यांनी केले आहे.


















