न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२३) :- पत्नीच्या अंगावर धावुन गेल्याचा जाब फिर्यादी पतीने आरोपीला विचारला. त्या कारणावरुन आरोपी व त्याच्या मेव्हण्यासह पाच जणांनी पोटनिवडणुकीसाठी जमावबंदी आदेश लागू असतानाही बेकायदेशिरपणे गर्दी व जमाव जमवला. प्लॉस्टीकच्या पाईपने फिर्यादी यांना हाताने व लाथाबुक्यानी मारहाण करुन तुम्ही तिघे सोसायटी गेटच्या बाहेर कसे येता, अशी दमदाटी करून शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २७) रोजी ११.३० च्या सुमारास राहत्या बिल्डींगच्या पार्किंगमध्ये, किवळे येथे घडला.
फिर्यादी सुनिल रामचंद्र यादव (वय ४६ वर्षे धंदा टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स रा. अॅक्सीसा सोसायटी, पलॅट नं.५०४, बी विंग, किवळे) यांनी आरोपी रमाकांत भगवान मोदगुल (वय ३८ वर्षे, धंदा खाजगी नोकरी, रा रूम नं ऐ/ ३०४ अॅक्सीसा सोसा साळुके वस्ती, किवळेगाव), साईनाथ शिवाजी विटकर (वय ३१ वर्षे, धंदा बिजनेस, रा. विजयनगर, काळेवाडी, वाकड), ज्ञानदेव विलास क्षिरसागर (वय ३२ वर्षे धंदा, टॅक्स कन्सल्ट रा. मोरया कॉलनी, भोंडवेनगर, वाल्हेकरवाडी), गणेश ज्ञानेश्वर देवकर (वय ३१ वर्षे, धंदा चार्टट आकाउंट, रा. विजयनगर, काळेवाडी), संकेत विठठल शिंदे (वय २२ वर्षे, धंदा चालक, रा. विजयनगर, काळेवाडी), पियुष (पुर्ण नाव माहीत नाही, रा. ए बिल्डींग अॅक्सीसा सोसायटी किवळे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
रावेत पोलिसांनी आरोपींच्या विरोधात १२०/२०२२ भादवि कलम १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३)/१३५ नुसार गुन्हा दाखल केला असून पाच जणांना सी.आर.पी.सी. ४१ (अ) प्रमाणे नोटीस देण्यात आली असून एकजण फरार आहे.
















