न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२३) :- पत्नी व मुलांसह फिर्यादी कपडे खरेदी करण्यासाठी पिंपरी बाजारपेठेत गेले होते. (दि २७) रोजी दुपारी दोन च्या सुमारास मुनाफ कलेक्शन या कपडयाच्या दुकानासमोरुन जात असताना फिर्यादी यांच्या तोंड ओळखीचा लहान मुलगा इम्रान शेख (वय १४ वर्षे) हा त्यांना भेटला. फिर्यादी यांनी त्याच्याकडे तु मोहिन गॅरेजमधील काम का सोडले, अशी विचारणा केली. तुला काय करायचे, तु जा असा तो फिर्यादीला म्हणाला. त्यावेळी त्याच्या ओळखीचे आरोपी तिघांनी काहीही कारण नसताना फिर्यादीना दादागिरी करतो काय? असे म्हणुन शिविगाळ करीत हाताने मारहाण केली.
सह आरोपी ४ याने लोखंडी पाईप घेवुन फिर्यादी यांना शिविगाळ करुन लोखंडी पाईपाने उजव्या खांदयावर व डोक्यात तसेच डाव्या हाताच्या मनगटावर मारुन फिर्यादीला दुखापत केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी इम्रान सादिक तांबोळी (वय ३६ वर्षे, धंदा चालक, रा. घर नं. ९३२, स्वराज कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) यांनी आरोपी सोहेब (पुर्ण नाव पत्ता महित नाही, वय २२ वर्षे अंदाजे), दानिश (पुर्णनाव पत्ता महित नाही, वय २३ वर्षे अंदाजे), इरफान (पुर्ण नाव पत्ता महित नाही वय २५ वर्षे अंदाजे), मुनाफ कलेक्शन येथे काम करणारा रिंकुचा भाऊ (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी चौघांच्या विरोधात २५१/२०२३ भादवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४, ४२७ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
















