न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२३) :- होन्डा कंपनीची हॉर्नेट (एमएच१४जेटी५३२५) हि दुचाकी आरोपी दुचाकी चालकाने भरधाव वेगात चालवुन फिर्यादीचे वडील सोपान सिताराम पिंजन (वय ७० वर्षे) यांना जोराची धडक दिली. अपघातात फिर्यादीच्या वडीलांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान (दि. ११ /०२/२०२३) रोजी पहाटे ४.४९ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. आरोपी दुचाकी चालक त्यांच्या मृत्यूस कारणीभुत झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा अपघात (दि ७/०२/२०२३) रोजी रात्री ७.१५ च्या सुमारास चाकण ते वासुली फाटा, भांबोली येथे घडला.
फिर्यादी सोमनाथ सोपान पिंजन (वय ३९, धंदा प्रिंटीग प्रेस, राहणार भांबोली पोस्ट वासोली) यांनी आरोपी शुभम शिवाजी भोर (वय ३० वर्षे, रा. भोरवाडी, वडगाव कांदळी, जुन्नर) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ५९/२०२३, भा.द.वि. कलम, २७९, ३०४ (अ), ३३७, ३३८ मो वा का कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे .
















