न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२३) :- वाल्हेकरवाडी येथील सर्वे नं. १३३ हिस्सा नं. १ या जमीन मिळकतीतील वाहेगुरु निवास या इमारतीतील दुस-या मजल्यावरील निवासी सदनिका क्रमांक सी ६, क्षेत्र ५०० चौ. फुट (४६.४६ चौ.मिटर) आरोपीने फिर्यादीला विकली. त्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करुन ती खरी असल्याचे भासवत फिर्यादीला सदनिका खरेदी करण्यास भाग पाडले. फिर्यादी यांची ११.७५,००० रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि ०१/०६/२०११ ते आजपर्यंत) सर्वे नं. १३३, हिस्सा नं. १, वाहेगुरु निवास, गुरुद्वारा चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडला. फिर्यादी उमेश बाळकृष्ण पावणे (वय ३६ वर्षे, धंदा-नोकरी, रा सी.६०२, शुभं करोती अपार्टमेन्ट, विद्या विनय निकेतन स्कुलजवळ, विशालनगर) यांनी आरोपी राचपाल उर्फ रामपाल सिंग कोहली, महीला फिर्यादी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलिसांनी दोघांच्या विरोधात १०७/२०२३ भादवि कलम ४२०,४०६, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
















