न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२३) :- सोमाटणे गावठाण हद्दीत तळेगाव दाभाडे येथील पवना नदीच्या कडेला, तळेगाव पंप हाऊस शेजारी आरोपीने त्याच्या कब्जात ४ किलो ३० ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशिररित्या विक्रीकरीता स्वतः जवळ बाळगला.
शिरगाव पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी (दि २८/०२/२०२३) दुपारी ४.३५ च्या सुमारास कारवाई करीत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एकूण १,००,७५० रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला.
हा गांजा आरोपीने दुसऱ्या आरोपीकडून विक्रीसाठी आणला होता. शिरगाव पोलिसांनी आरोपी विरोधात ६४ / २०२३.एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) () (ब), २९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
प्रविण रमेश शेडगे (वय ३० वर्षे रा. घर नं. ११४/ए सोमाटणे गावठाण, तळेगाव ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मराठे (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्यावर गुन्हा दाखल आहे.
















