न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२३) :- सातारा सहकारी बँकैची शाखा मालवणी, मालाड येथुन आरोपीने रो हाऊसवर जमीन / इमारत तारण ठेवून ४० लाखांचे कर्ज घेतले. काही दिवस त्या कर्जाचे हफ्ते भरले. पुन्हा कर्जाचे हफ्ते भरणे बंद केले. त्यामुळे बँकेने कर्जाचे हफ्ते न भरल्याने आरोपीच्या मिळकतीचा कायदेशीररित्या ताबा घेतला. मिळकतीचा लिलाव केल्यांनतर आरोपीने मिळकतीमधील साहित्य त्यांना माघारी देण्यात यावे, अशी विनंती केली. बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपीना त्यांचे साहित्य माघारी देण्याकरिता मिळकतीच्या ठिकाणी नेले. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या ४ ते ५ सहकारी मित्रांना त्या ठिकाणी बोलावुन घेतले. बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांना शिवीगाळ, धक्काबुक्की तसेच दमदाटी करुन मालमत्तेमधुन जबरदस्ती बाहेर काढले. मालमत्तेला असलेल्या कंपाउंडच्या गेटला स्वतःचे कुलूप लावुन मालमत्तेवर बँकेच्या वसुली अधिकाऱ्याचा कायदेशीर ताबा असताना त्या मालमत्तेवर त्यांच्या सहका-यांच्या मदतीने गैरमार्गाने बळजबरीने बेकायदेशीररित्या जबरदस्ती ताबा घेतला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि २४/०२/२०२३) ५.०० वाजेच्या सुमारास रो हाऊस नं. १०५ वि.नं.१९, तोरणा कृष्णा होसि सोसा. शिवसागर से नं. २७ अ, तोरणागड, प्राधिकरण निगडी येथे घडली.
फिर्यादी उमेश किसन महाजन (वय ५६ वर्षे, धंदा नोकरी, रा. १/१०१ शिवतिर्थ अपार्ट. जाधव कॉलनी, बेलवली, बदलापुर पश्चिम, ठाणे यांनी आरोपी स्वप्निल सुभाष कणसे (रा. रो हाऊस नं. १०५ बि.नं.१९ तोरणा कृष्णा होसि. सोसा. शिवसागर से.नं. २७ अ तोरणागड प्राधिकरण निगडी), अमित हरिभाऊ शेवाळे (पत्ता माहीत नाही), भुषण रविंद्र पाटील (पत्ता माहीत नाही), अक्षय बाबुराव शिंगोटे (पत्ता माहीत नाही), झांबरे (पुर्ण नाव माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
निगडी पोलिसांनी १२४/२०२३ भा.दं.वि. कलम ४४८,१४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















