न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२३) :- हैद्राबाद, तेलंगानास्थित साहीती इन्फ्राटेक वेन्चर इंडीया प्रा. लि. चे आरोपी एमडी ओनर यांनी २० एकरामध्ये सरवानी इलाईट नावाचा १० टॉवरचा प्रोजेक्ट प्री लाँच केला. त्यामध्ये फिर्यादीचे पती इमाम गालीब व मुलगी आरशिया यांनी दोन फ्लॅट बुक केले. एकुण ६४,००,००० रुपये भरले. इमारतीत दोन फ्लॅट देतो असे सांगुन आरोपींनि फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. परंतु, त्यांना फ्लॅट अगर त्यांनी गुंतवलेले पैसे परत न देता त्यांची आरोपींनी फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटलं आहे.
हा प्रकार (दि. ११/१२/२०२० ते दि. २५/०९/ २०२२ पर्यंत) एचडीएफसी बँक, थरमॅक्स चौक, चिंचवड येथे घडला.
महिला फिर्यादीने आरोपी लक्ष्मीनारायण बुडाती (वय ४४ वर्ष, रा साहीती श्रेष्ठ, रोड नं. ३६, प्लॉट नं.१२२२, ४ था मजला, जुबली हिल्स जवळ, चेक पोस्ट, मेट्रो रेल्वेस्टेशन रोड, हैद्राबाद, तेलंगाना), पार्वती बुडाती (वय अंदाजे ४० वर्ष), पुर्णचंदर राव (पुर्णनांव पत्ता नाही), भास्कर नायडु (पुर्णनांव पत्ता नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी तिघांच्या विरोधात १२५/२०२३ भा.दं.वि. कलम ४०६, ४२०,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.












