न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२३) :- वेअरहाऊस (हब) मधुन वितरण प्रणालीतील अज्ञात टप्प्यातील माल ताब्यात असलेल्या आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता मोबाईल ऑनलाईन ऑर्डर केली. त्यानंतर खरेदीदार न आल्याने मोबाईल अॅव्हाको कंपनीस परत केले. अॅव्हाको कंपनीस मोबाईल न मिळाल्याचे सांगुन फिर्यादीच्या कंपनीकडुन त्या किंमतीचा क्लेम एकुण रु. ११.१४,८२३ किंमतीचे एकुण ५७ मोबाईल फोन चोरुन नेले किंवा परस्पर अपहार करुन कंपनीची आर्थिक फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार सप्टेंबर २०२२ ते ०१/१२/२०२२ पर्यंत हाईवलुप लॉजिस्टीक प्रा. लि. या कंपनीचे ताथवडे येथील वेअर हाऊस (हब) मध्ये घडली.
फिर्यादी विक्रांत चंद्रकांत मेवाडा (वय ४७ वर्षे, व्यवसाय सिक्युरीटी हेड, रा. समर्थकृपा को. ऑप हौ. सोसायटी, ए ४०१, स्वामी समर्थ मठासमोर नांदीवली रोड समर्थनगर, डोंबीवली पुर्व. जि. ठाणे) यांनी आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी आरोपीच्या विरोधात २११/२०२३ भादविक ३७९,४०६, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.












